जीवनकला
जीवनकला
दिवस जसा लहान मोठा होतो
तसेच जीवन ही कलेकलेने वाढून
त्यात सप्तरंग भरत असतोय अन्
ही जीवनकला शिकवतेय जगने.
आयुष्यात कधी दु:ख, कधी सु:ख
नैसर्गिक आपत्तीने तो पोळतोय
तेंव्हाच जीवनकलेचे महत्व तो
माणुस खऱ्या अर्थाने ओळखतोय.
जीवनकला जगण्याची पद्धत ही
प्रत्येकालाच सु:खी करत नसते
किती ही मेहनत केली जीवनात तरी
आंनद कायम स्वरूपी टिकत नसतो
मणुष्य जन्माला येतोय तेंव्हा
रिकाम्या हातानेच तो येत असतो
गरीबांना भरणपोषणाची चिंता
हळुहळु जीवन तो ढकलत असतो
पुर्वजन्म कोणी पाहिला हाच
जन्म श्रेष्ठ समजून प्रेमाने जगावे
समाजात आपली ओळख व्हावी
याकरिता प्रयत्न करत रहावे..
