शूर शिवबा
शूर शिवबा
शिव जयंती
समारंभ आज
उत्सवाचा साज
चढवू अंती ...
राजा शिवाजी
देश अभिमान
मनी असे मान
गोष्ट ही ताजी ...
जिजाऊ पुत्र
किती पराक्रमी
जिंकण्याची हमी
हातात सूत्र ...
किती बांधले
किल्ले तटबंदी
तळघरी बंदी
चोर डांबले ...
हे शिवराया
पुन्हा जन्मा यावे
कलीयुग जावे
धरावी छाया ...
राज्य स्थापावे
हिंदवी स्वराज्य
आहे अविभाज्य
मनी जाणावे ...
