Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

उंबरठा

उंबरठा

1 min
156


स्त्रियांनी ओलांडला

जेंव्हा उंबरठा

गाजावाजा झाला

केला ठणाणा

माजघराच्या बाहेर

न येणारी स्त्री

पाहिले पाऊल

भितीने टाकलं

बाहेरच्या मोकळ्या हवेत

कधी घाबरली

कधी थोडं बावरली


शिकली , सवरली

मग कक्षा तिची रुंदावली

गगनात भरारी मारली

किती पदे , किती पदव्या

प्रमाण पत्राने तर

कपाटे भरली...

वकील , डॉक्टर

अगदी कमिशनर पर्यंत

मजल मारली...


आज तुझा गे

अभिमान मजला

तुझ्या पदाने

  मान गे उंचावली ..


 देवास प्रार्थना

राहू दे असाच तुझा 

मनात साऱ्यांच्या सन्मान

परी एक सांगते

वागण्या , बोलण्यात 

सतत ठेव ग तुझे भान ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational