दसरा
दसरा
*विजया दशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...*
दसऱ्याचा सण l आहे आनंदाचा ll
उत्साह मनाचा l आहे मोठा ll
आनंदाचा सण l आहे पहा आज ll
चढवुया साज l मनावर ll
साडेतीनातील l मुहूर्त मानतो ll
दिवस असतो l तो मोलाचा ll
पौराणिक कथा l जोड दसऱ्याला ll
आनंद मनाला l मिळो छान ll
महत्त्व सणाला l राम विजयाचा ll
दुष्ट रावणाचा l अंत्य जाण ll
दाराला तोरण l स्वागत करुनी ll
रामास पूजुनी l मोद घेऊ ll
आपट्याचे पान l प्रतीक सोन्याचे ll
अर्पूया मानाचे l देवादीका ll
सौ. मनिषा पटवर्धन
