रामनवमी
रामनवमी
1 min
4
रामनवमी
दिवस भाग्याचा
रामाच्या भक्तांचा
आशिष हमी ...१
उत्सव छान
होणार साजरा
चला त्वरा करा
करू सन्मान ...२
बाराची वेळ
चालले सकल
पूजनाचे फल
साधला मेळ ...३
मूर्ती सुंदर
राम सीता संग
झाले मन दंग
जोडले कर ...४
लक्ष्मण भ्राता
लीन हनुमान
देवतेचा मान
श्रीराम त्राता ... ५
केले पूजन
गंध फुले वाहू
राम रूप पाहू
रंगते मन ...६
वाटू प्रसाद
सुंठवडा घ्या हो
गजर करा हो
आर्तता साद ...७
