STORYMIRROR

nits Shelani

Inspirational Others

3  

nits Shelani

Inspirational Others

स्वसंरक्षण

स्वसंरक्षण

1 min
207

हे काल्पनिक आहे पण जगात वास्तविकता आहे हे ही तितकेच खरे आहे..)

(आदर करा तिच्या सौंदर्याचा दर ठरवू नका...)


हो अजूनही वाटे मला भिती त्या अंधाराची...

कसे विसरू मी, गोष्ट त्या रात्रीची...

येतो अंगावरी काटा,नको स्मृती त्या प्रसंगाची...


का नेहमी स्त्रीनं किंमत मोजावी स्त्रीजन्माची??

अघटित नाही घडले कृपा ती देवाची...

पण त्या तुच्छ स्पर्शाने,

लाही लाही झाली माझ्या मनाची...

त्या रात्री मी वाचली,

खरंच काय असेल अवस्था एका पिडितीची,

ह्या जाणीवा ने मला झोप नाही यायची...

खोल दरी मानसिक वेदनांची,

मी प्रयत्न करत आहे भरण्याची...

अजुनही वाटे मला भिती त्या अंधाराची...


गरज आहे आता प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षणाची...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational