STORYMIRROR

nits Shelani

Abstract Fantasy Inspirational

3  

nits Shelani

Abstract Fantasy Inspirational

आठवणींचे रंग!

आठवणींचे रंग!

1 min
154

येता होळीचा हा सण,

आठवते मग बालपण, 

गावातील चौकीवर गोळा व्हायचे सर्वजण...


सुपारीचे झाड उंचच त्याची शान,

नाचत-गाजत आणून, द्यायचे तिला होळीचा मान...


नैवेद्याला मात्र पुरणपोळी थाळ,आणि बताशाची लांबच लांब माळ...


नटून-थटून सगळे जमायचे, 

बोबां मारीत होळी भोवती फिरायचे...


त्या पवित्र अग्नीमध्ये...

आपल्या अंहकार,वाईट गोष्टींचे समर्पण करायचे..

येणाऱ्या चैत्र नववर्षाचे सुंदर मनाने स्वागत करायचे.


दुसर्‍ दिवसाची मजा असायची वेगळी...

खेळायची असे रंगाबरोबर होळी....

एकत्रपणे येऊन भरून घ्यायची आनंदाची झोळी...


नसतो रंगाना जातपात,धर्म...

ऐकमेकांमध्ये मिसळुन जाणे हे त्याचे कर्म..


खाऊन पुरणपोळी, मालपुआ,गुजिया अश्या मिठाई...

जोडीला प्यायची थंड थंड थंडाई...


आली रे आली होळी आली...

पुन्हा रंगीत आठवण ताजी झाली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract