आईविना भिकारी
आईविना भिकारी
८ मार्च जागतिक महिला दिन होतो साजरा...
गोड स्तुती करून स्त्रियांना मिळतो मानाचा मुजरा...
स्त्री शक्ती, सक्षम नारी,स्त्रियांची महती,
असे बरेच काही लिहिले जाते तुझ्या वरती..
एकच दिवस का होईना,होतो तिचा सन्मान...
प्रत्येकजण सोशल मिडियावर लिहितो स्त्री बद्दल छान...
आज मीही मांडणार माझ्या आई विषयी काही..
माझ्या आईला मात्र....
मिळालेच नाही कधी तिच्या मनाचे स्वतंत्र...
स्त्री शक्ती चे महत्त्व...
तिला कधी माहीत च नव्हतं...
तिची काय आवड-निवड,
जाणून घ्यायची कोणाला होती सवड?
तुला काही नाही कळत...
पण कायमची तीच रहायची पळत...
घर,शाळा,ऑफिस सगळे तीच बघत असते..
तरी म्हणायचे, "आई कुठे काय करते"?
मीही नाही समजू शकली आईला...
म्हणूनच तिच्या विषयी घेतले आज लिहायला...
"आई"आज माझ्या लेखणीतून तुला केले व्यक्त...
माझ्यासाठी माझी प्रेरणा,प्रतिभा तुच आहे फक्त...
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...
(तुच माझे पारायण,तुच माझी वारी)
