दिवाळी फराळ
दिवाळी फराळ
स्टोरीमिरर च्या कुटुंबाला माझ्या दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा... शुभ दिपावली..
(दिवाळीत फराळांचा आपसात चाललेला संवाद..)
घरात चालु होती तयारी,
फराळ करायचा कोणी मोठी जवाबदारी...
दिवाळी ला फराळाचा सजला गेला ताट....
लाडु,अनारसे,शंकरपाळी,
करंजा,चकल्या,चिवडा अन् शेव...
ह्याचा आपलाच होता एक थाट...
एकाच ताटात सगळे दाटीवाटी ने बसले...
आणि एकमेकांकडे पाहून मिश्किलपणे हसले..
लाडू सांगे, मी तर आहे गोल गोल...
माझ्या शिवाय दिवाळीला कुठला मोल??
अनारसे ही कुचकट पणे म्हणे
आहे मी किचकट,सोप्प नाही मला करणे...
करंजीला तर चकलीचा राग वाटे...
म्हणे तिला तुझ्या अंगावर आहेत किती काटे...
चकली लगेचच,म्हणते
ए जाडे!! तु तर तेलात जाताच फाटते...
आहे मी साधी भोळी...नाव माझे शंकरपाळी
वेगवेगळ्या आकारातही मी माझी निराळी...
शेव आणि चिवडा एकमेकांकडे बघून म्हणाले,
आपण दोघेही एकमेकांसाठीच आहेत बनलेले...
असा हा फराळाचा संवाद....
एकमेकांशी ते करतात वाद...पण...
तरीही दिवाळीला ह्यांच्या मुळेच येतो स्वाद..
सर्वांना दिवाळी च्या फराळमय शुभेच्छा...
