STORYMIRROR

nits Shelani

Classics Inspirational Others

3  

nits Shelani

Classics Inspirational Others

माऊली

माऊली

1 min
114

आली आषाढी देवशयनी एकादशी,

वारकरीं करीता पंढरपूर हीच काशी..


कुठे श्याम सावळा...तर कुठे विठू सावळा,

दर्शना करीता पंढरपूरी भक्त होई गोळा...

दृष्ट न लागो...असा भव्य दिव्य लागे हा सोहळा.


टाळ,मृदुंग,अभंग,कीर्तन...

वारकरी नाचती...होऊनी तल्लीन...


तुळशी वृंदावन घेऊनी माथ्यावर...

मायने धरली वाट पंढरपूर...


हिच आस...एकच ध्यास ऊरी...

ह्या पावलांनी चढावी.. विठू मंदिराची पायरी...

आलो चंद्रभागे च्या तीरी...

माऊली तुझ्या दारी...

आता दे दर्शन,

पाहू दे तुलाडोळे भरून...

हे माझ्या सावळ्या विठू हरी...


विठ्ठल विठ्ठल श्री हरी....विठ्ठल,

किती भक्तिमय हे बोल...

नाम घेता होई जीवन अनमोल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics