STORYMIRROR

Prof Purushottam Patel

Inspirational

3  

Prof Purushottam Patel

Inspirational

शिवसूर्य जननी

शिवसूर्य जननी

1 min
263

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब यांना 

शब्दसुमनांनी विनम्र अभिवादन!

                        शिवसूर्य जननी

                   दशदिशांना काळोख असता

तू झाली सह्याद्रीच्या उषःकाल

तुझ्याच पोटी शिवसूर्य उदेला

जाळीयेला अन्यायाचा काळ 


तुझ्या रुपे प्रकटली भूवरी

अष्टभूजा जगतजननी भवानी

शब्दाशब्दात प्रसवे तुझ्या

दृष्ट दूर्जन संहारक वाणी


अनंत यातना सोसून वर्मी

आऊ ! तुम्ही मानिली ना हार

शून्यातून निर्मिले हिंदस्वराज्य

खजील केलेस शत्रू ते चार !


जिजाऊ तुमचे विचारधन

पेरीले हो मी माझ्या हृदयी 

कोटी कोटी विनम्र अभिवादन

करितो आज पावन समयी !

 

  विनम्र अभिवादन



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational