दिप अमावस्या
दिप अमावस्या
आज दिप अमावस्या
आषाढाला देऊ निरोप
संस्कृती जपून आपुली
नाती ठेवू या निकोप!
श्रावणाचा पूर्व संध्येला
उजळू दिप लावू वाती
तन मनातून जागवू या
स्नेहाची तेजोमय नाती
कापसाची वात शिकवी
ठेवावे मृदु कोमल हृदय
काया वाचा मने करावा
पितरांना तृप्तीचा मनोदय
सौख्याचे किरण पसरता
पळून जाई तम सारा
उमेद मिळेल जगण्याला
नैराश्य जळून घरादारा
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
