मुली,सावध रहा
मुली,सावध रहा
अनोळखी जागा असता
राहा अतीशय सावध
टपुन बसला शिकारी
सहज कराया सावज
मुली दुनिया झालीय
जंगल रान दरी खोरी
दबा धरुन बसले चोर
करावया हरामखोरी
अनोळखी जागा असता
भूलू नये लाळ घोट्यांना
जपून रहावे स्वतःला
माणसातील श्वापदांना
भूक त्यांची लई असुरी
कधीही तोडती लचके
हाती ठेव धैर्याचे शस्र
जागृत रहा तू हटके
