STORYMIRROR

Prof Purushottam Patel

Abstract Inspirational

3  

Prof Purushottam Patel

Abstract Inspirational

कोजागिरी

कोजागिरी

1 min
168

कधी नव्हे आज बाई

नवल मी हो पाहिले

ढगाआड होते लपलेले

चंद्र खुदकन नभी हसले

हरणांच्या गाडीवर आज

चंद्रासवे चांदणी आरुढ

लख्ख चांदण्या रात्रीला

गाईले कोजागिरीचे भारुड

हसतांना त्याचा गाली

दिसली मज गोड खळी

चांदणी होती सोबतीला

दोघे बसले तरुतळी

चंद्र किरणांचा संगतीने

बहिण लक्ष्मी आली दारी

दिले शुभ आशीर्वाद 

जे जागृत होते नर-नारी

केशर शर्करादुग्धात न्हाले

शरदपौर्णिमा चंद्र किरण

क्षीर भासे अमृत द्रोणी

आनंदे प्राशिती सारे जण

धन धान्याची समृद्धी

लेऊन उभ्या दशदिशा

हिच सर्व बंधु भगिनींना

कोजागिरीच्या शुभेच्छा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract