लेक माझी गुणांची
लेक माझी गुणांची
आज राष्ट्रीय ' कन्या दिवस '
लेकीला समर्पित हे काव्य
लाडाची ग लेक माझी
तू कोटी गुणांची खाण
तुझ्या जन्माने लाभला
मज पित्याचा हो मान
लाडाची ग लेक माझी
जणू भासे लक्ष्मी छान
पोरी झालो ग् मी कवी
गाता गाता गुणगान
लाडाची ग् लेक माझी
तू व्हाव ऐंश्वर्यवान
पडता पाऊल तुझे
उगवे प्राजक्त रान
लाडाची ग् लेक माझी
वाढो यश किर्ती मान
प्रभो ऐक ही प्रार्थना
न सरो मानाचे पान
