बाय २०२४!
बाय २०२४!
इसवी सन दोन हजार चोवीस
मला न मागता तू खूपच दिलं
चालता बोलता बसता उठता
खळखळून हसायला शिकवलं
तू तर दिलास एक छान मंत्र
धरु नये कधी मनात टेन्शन
मित्र मैत्रिणीसोबत बसून
उपभोगावं आनंदाचे पेन्शन
तूच तर शिकवलीस मला
मित्रा जगण्याची खरी किंमत
प्रेम जिव्हाळा द्यावा मुक्तहस्ते
चालायला मिळते हिंमत !
तूच तर दिलेस रेऽऽ मला
महाराष्ट्रभरात नवनवे मित्र
लिहित रहा वाचित रहा
स्नेह वाढविण्याचे नवे सुत्र
तेहत्तीस वर्ष मम तपाचे
तू दिले निवृत्तीचे गोड फळ !
प्रेम, आपुलकी मनी असता
पदोपदी लाभे जगण्याचे बळ
संकटात तूच मला म्हणाला…
लढत रहा सोडू नको धीर !
फेकून द्यावी क्लेषाची वस्त्रे
आपणच व्हावे महा वीर !
झाकली मुठ उघडू नये !
कधीही केव्हाही दुसऱ्यांसमोर
कोरलाय तू दिलेला संदेश
कायम माझ्या हृदय पटलावर
सन दोन हजार चोवीस तू…
हट्टालाच पेटलाय जायला
आठवणींची घेऊन मोरपीसं
दोस्ता येत रहा रे भेटायला!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल “ पुष्प ”
