STORYMIRROR

Prof Purushottam Patel

Abstract Classics Inspirational

4  

Prof Purushottam Patel

Abstract Classics Inspirational

अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा

अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा

1 min
299

आला उत्सव स्वातंत्र्याचा

अमृत महोत्सवी वर्षाचा

घरोघरी फडकवू तिरंगा

संदेश पसरवू  एकतेचा


देशप्रेमाची ज्योत पेटवू 

गाऊन गाथा बलिदानाचा

वंदे मातरम् देऊन नारा

जनमनात जागवू स्मृती शहीदांचा


केशरी पांढरा अन् हिरवा

जगावेगळा तिरंगा आमुचा

श्वेतभागी अशोकचक्र विराजे

जाणीव करी ते कालचक्राचा


केशरी रंग शिकवी त्याग 

श्वेत सत्य शांती पावित्र्याचा

समृद्ध राष्ट्रनिष्ठा शिकवी हिरवा

प्राणाहुन प्रिय तिरंगा भारतभूचा


चंद्र सूर्य असेतो राखू

आम्ही गौरव भारतमातेचा

वक्र दृष्टीने पाहता शत्रू

घोट घेऊ त्या रक्ताचा !


शपथ घेतो तव रक्षणाची

करीतो अभिषेक हा रक्ताचा

फडकत ठेवू उंच आभाळी

प्राणपणे तिरंगा स्वातंत्र्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract