दातृत्वाचे महादान [अष्टाक्षरी]
दातृत्वाचे महादान [अष्टाक्षरी]
दाता असतो देणारा
देतो हृदयापासून
घ्यावे दातृत्व शिकून
ठेऊ नये हो राखून ।।१।।
निसर्गासारखा दाता
जगी दुजा नव्हे कुणी
कण अन् कण देतो
बडेजाव नाही मनी।।२।।
तप्त होऊन सागर
जल देतसे मेघाला
मेघ देई मुक्तहस्ते
थेंब न् थेंब धरेला ।।३।।
माझा शेतकरी राजा
सांभाळतो दातृत्वाला
थंडी उन्हात राबून
घास देतो जगताला।।४।।
तन देऊन इंद्राला
दावी दातृत्व जगती
चंद्र सूर्य नित्य सांगे
दधिचीची हो महती।।५।।
शिबी राजाचे दातृत्व
आहे जगती महान
दिला स्व-मांस लचका
वाचविले खग प्राण।।६।।
