STORYMIRROR

Prof Purushottam Patel

Romance Classics Inspirational

3  

Prof Purushottam Patel

Romance Classics Inspirational

सांगाती [अष्टाक्षरी]

सांगाती [अष्टाक्षरी]

1 min
123

प्रिये, भेटता तू मला

दवबिंदू भासे जणू

प्रीति किरणात ग् !

मज वाटे इंद्रधनू


सप्तरंगी रंगलो मी

प्रिये तुझ्या सोबतीने

अनुभूति आनंदाची

तुझ्यासवे जगण्याने


धन्य झाला जन्म माझा

तुझ्या हात घेता हाती

आल्या तेजाळून जणू

स्नेह सौख्यासवे नाती


तेज:पूंज राहो सदा

विश्वासाची दिव्य वाती

जन्मोजन्मी राहो देवो

जोडी अखंड सांगाती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance