प्रीत
प्रीत
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जीवनाच्या प्रवासात तुजवर प्रीत जडली,
कशी अचानक ती फुलून जादू अशी घडली.....!!१!!
तु माझा मी तुझी स्पर्शभरे भास सारे होते,
क्षण एकही विना तुझ्या सारेच बेधुंद होते.....!!२!!
आणाभाका नि अबोल भाषा दिन होते सुखाचे,
नवीनवी प्रीत बेभान करूनी स्वप्न सजले अंतरीचे...!!३!!
काळ असा फिरला अचानक तू न माझा राहीला,
बोथटल्या भावनांचा आशाभंग तू असा का केला...!!४!!
मनी एक सवाल आता प्रीत कुठे हरवली,
तुझ्याविना सांगू कशी मी न माझी राहिली....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷

