कार्तिकी एकादशी
कार्तिकी एकादशी
आज एकादशी,देव माझा खास
दर्शनाची आस,अंतराला...१
रूप मोहविते,विटेवरच्याचे
सोने आयुष्याचे,नामजप...२
कार्तिकी आजची,आठवे पंढरी
पायी-पायी वारी,वारकरी...३
नामाचा गजर, मनोमनी केला
पांघरूनी शेला, पांडूरंग...४
सौख्य-समाधान,तोचि देई सारे
दैन्य-दु:ख हारे, चराचरी...५
देवा तूच माझा,अंतरी सुवास
भुलली रूपास,काव्यजया...६