STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

वडील

वडील

1 min
143

   काळजाला स्पर्श करणारा

   शब्द नयनांना पाझरतो,

   आठवणींच्या समुद्रात

   हृदयास हेलावतो...


   वडील काय,बाप काय

   आयुष्यास सावरले,

    आठवून सारे क्षणांस

   मन माझे गहीवरले...


   आज मी सुखात आहे

  त्याचे कारण माझा बाप आहे,

  आयुष्याच्या पथावर

   सौख्यदायी माप आहे...


   किती आठवावे त्या क्षणांना

   बापांकुर मनी गुंजन करी,

   अलवार मिटता पापणी

   सुख-दुखाच्या बरसती सरी..


   किती झेलले वादळांना

   आपलेसे साऱ्या यातनांना,

   हसून सारे सहन केले,

  दडवूनी साऱ्या भावनांना...


  घट पडले हातांना कष्टून

  आतातरी वाटते सुखवावे,

  इतकी करावी सेवा वाटतं

  आयुष्यही कमी पडावे...


  माझे आयुष्य त्यांना मिळावे

  सुखाचे सारे क्षण लाभू दे,

  आसवांनी भिजल्या भावना

  आत्म्याचे नाते फुलू दे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational