आदर्श व्यक्तिमत्व
आदर्श व्यक्तिमत्व
आकारले चरित्र माझे
असे आदर्श व्यक्तिमत्व,
अनुकरण त्या विचारांचे
जगण्याचे गवसले सत्व...
आनंदवनात नंदनवन
कुष्ठरोगींचे पुनर्वसन,
मुक्या कळ्यांना आकारले
असे ते सेवासदन...
समाजकार्याचा वसा अविरत
अपेक्षा न कधी कसली केली,
हास्य फुलवूनी ओठी तयांच्या
वेदनांची होळी केली...
असेच लाडके आमुचे
बाबा आमटे होते,
पाठीवरती थाप देऊनी
आशिष मज लाभले होते...
निष्ठावंत शिक्षिका होऊनी
समाजकार्य चालव वसा,
आशिर्वादरूपी संदेश मज
त्यांनी दिला असा...
प्रेरणा मज सदैव देती
शब्द परीस होऊनी,
सदैव अमर रहाणार इथे
थोर तयांच्या कार्यातूनी...
