STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

भक्ती विठ्ठलाची

भक्ती विठ्ठलाची

1 min
127

  जगी एक विश्वासाचा

  मज गवसला धागा,

  भक्तीमय मन होता

   शांतमय वाटे जागा...


   देव जगी माझा एक

   पांडूरंग सौख्य देई,

   निष्पर्णता क्षणभर

   बहरून अशी येई...


   भक्ती विठ्ठलाची करू

   नाम मुखाने घेऊनी,

   नाद भक्तीमय मनी

    भाव भक्तीचा देऊनी...


    आस दर्शनाची तुझ्या

    मज विठ्ठला लागली,

    आयुष्याच्या ओंजळीत

    सौख्य पाकळी जागली...


    असा माझा देव शोभे

    हात कटावरी सदा,

    भाळी चंदनाचा टिळा

    गाली साज स्मित अदा...


    सुखी साऱ्या जीवा ठेव

    समाधानी देता ठेवा,

    येवो बहर मनाला

     नको मनी द्वेष,हेवा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational