मातृत्व
मातृत्व
मातृत्व
तुच माझा श्वास
तुच माझा ध्यास
तुच लाडक्या आमच्या
जीवनाचा आधार.
इवली इवली स्पंदन
कोमल तुझा स्पर्श
श्वास गुंतला तुझ्यात
अवखळ ओठी हास्य
क्षणात थकवा विरला
कुशीत तू येता
जग झाले सान
तुझा जन्म होता....
परिसस्पर्श आयुष्याला
कल्पतरु सुखाने बहरला
खुलता मनमोहक लकेर
परिपुर्ण झाले माझे जग
परिपुर्ण झाले माझे जग
सौ.ऊर्मी( हेमश्री) घरत.पालघर
8793621091
