स्त्री
स्त्री
1 min
452
साऱ्यांची मने जपावी
आदरातिथ्य भरून करावे
ज्याला जे हवे ते देऊनी
सर्वांचे चोचले पुरवावे...
स्वत:च्या मनिच्छा दडपुन
दुनियादारी उगी झेलावी
प्रयत्ने कर्तव्ये कर्मता
बोचरी बोलणी ऐकावी
हौस,उत्साह छंद जपता
रोष मिळे स्वकियांचा
स्पष्टता एकेक क्षण
प्रश्न उभा अस्तित्वाचा
मुक्त मनसोक्त विहारता समाज
मधुरंग परिधान करावे
असे जगावे तिने.
असे जगावे तिने