माय मराठी
माय मराठी
एक एक अक्षर बोले
नव अक्षरांचे होई गुंजन
माय मराठीचे शब्द स्वरित
स्वच्छंद रचिता काव्यपुष्प सृजन
मुक्त होती व्यक्त भाव
माय मराठी असता वदनी
थेट भिडे स्वैर काळजाला
ना आसक्ती ना होई दुजाभाव
सहज कळती समृद्ध संस्कार
माय मराठी माझी महाराष्ट्राची शान
बोलेल त्याला क्षणात उमगते
अभंग ओव्या म्हणता हरपते देहभान
गोडवा भाषेचा कधीही न होई अवीट
एकेक शब्दांची उकलता गुंफण
माय मराठी साज मनाचा
अभिमान स्वाभिमान अलंकार हा अवघ्या महाराष्ट्राचा
अभिमान स्वाभिमान अलंकार हा अवघ्या महाराष्ट्राचा
