STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Drama Classics Inspirational

3  

Urmi Hemashree Gharat

Drama Classics Inspirational

एक पाऊल प्रगतीचे

एक पाऊल प्रगतीचे

1 min
156

क्षितिजा पार आस अधीर 

एकेक उकल करताना 

नवनिर्मितीचा ध्यास उरी 

पाऊल प्रगतीचे एकेक रांगताना 


जुन्या नव्याची मैफिल हळवी

ज्ञानरांजण भरता भरताना

अध्यापनाची रीतही न्यारी

 पाऊल प्रगतीचे एक एक धावताना


विविध धोरणांची रेलचेल नवीन

 नव्याने कक्ष निर्मिती करताना

 गुणवत्तेची कासही प्यारी 

पाऊल प्रगतीचे एक एक वाढताना


विषय समृद्धी होते निपुण

 नियोजनबद्ध संकल्प रुजताना 

वक्तशिरपणे होती कार्य सारी 

पाऊल प्रगतीचे एक एक प्रसारताना


उपक्रमासह संस्कृतीची उधळण

 नवतंत्रज्ञानाचे आतिथ्य करताना

 एकजुटीने करतो शिक्षणसमृद्धीची वारी

 पाऊल प्रगतीचे एकेक जिंकताना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama