STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Abstract Action Classics

3  

Urmi Hemashree Gharat

Abstract Action Classics

एक पाऊल प्रगतीचे

एक पाऊल प्रगतीचे

1 min
281

 काळ बदलता वेगाने

 वाहती वारे बदलाचे

 कर्तृत्व कर्मिता निस्वार्थी

 खुणावते ते एक पाऊल प्रगतीचे..1


 स्विकारता बदल जरासे

 संचित आधुनिक तंत्रज्ञानाचे

 वाट हर्षावता स्वरांगी

 झेपावते ते एक पाऊल प्रगतीचे..2


 ऑफलाइन शिकताना नेमके

 धडे ओंजळीत दृढावती ज्ञानाचे

 ऑनलाइनच्या विश्‍वात मधुरंगी

 गर्जते ते एक पाऊल प्रगतीचे..3


 वेळेचे अंकगणित जुळता

 सिद्धले प्रयोग अध्यापकिय नवोपक्रमाचे

 अद्ययावत करण्या ज्ञानार्थी

 घडले ते एक पाऊल प्रगतीचे..4


 विश्वसंचार आभासी शिकता सजले ज्ञानरांजण विविधतेचे

 शिक्षणाचे माधुर्य सुरंगी

 दाखवी ते एक पाऊल प्रगतीचे..5


 ज्ञानार्जनात सातत्य राखता

 गुपित कळते यशप्राप्तीचे

 प्रयत्नांचे संस्कार रुजता अंतरंगी

 जिंकते ते एक पाऊल प्रगतीचे

प्रयत्नांचे संस्कार रुजता अंतरंगी

 जिंकते ते एक पाऊल प्रगतीचे..6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract