माय मराठी
माय मराठी
संस्कृतीच्या भव्य पालखीचे
चौघडे वाजता गल्लोगल्ली
हर्ष होतो जीवाला
व्यक्त होते ती असते माय मराठी..
अंतर्मुख होऊन सुजनांच्या
कैक मैफिली उल्हासात
तु,मी अन् तेही सामील
जेथे होतो ती असते माय मराठी
विविधरंगी चित्तवेधक प्रसारांनी कलाविष्कारांची नांदी उठता
गर्जते अविरत नादमय
नव्याने जिंकते ती असते माय मराठी
काळजातली सल झोंबताना
संवाद मुक्त विचारांचा
एकेक परीस धुंडाळतो
तेव्हा एकाकी झुंजते ती असते माय मराठी
भावनांचे अव्यक्त पडसाद
चौफेर दशदिशांत घुमता
हिरकणीसम जागृत ध्येयवेडी मनामनात रूंजी घालते ती असते माय मराठी
ती असते माय मराठी...
