STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Romance Fantasy

3  

Urmi Hemashree Gharat

Romance Fantasy

पाऊस

पाऊस

1 min
209

मन चिंब होते 

घन बरसून येता

पायवाटही शृंगारते नव्याने 

पाऊस अनामिक पाहता..१..


सृष्टी हसते गाली

नभ भरून येता

आभाळ खोडकर गर्जते

पाऊस अनामिक पाहता..२..


अंकुरते नवे काही

जलधारा वळुन येता

दवबिंदु ऊगीच डौलात

पाऊस अनामिक पाहता..३..


मनिच्छा स्पर्शिते अंतरी

तुझी आठव येता

स्मितवदने भरते ओंजळ

पाऊस अनामिक पाहता..४..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance