श्रावणसरी
श्रावणसरी
1 min
33
एक एक थेंब मोतिया
ओघळताना हळुच म्हणाला
श्रावणसरीची मजा निराळी
सृष्टीच्या गावी अंकुरल्या जाणिवा..१..
पायवाट पाणंदी झरे झुळझुळ
वाहती धबधबे सांगती गंमत
रानभाजी भरास पीकही डौलात
श्रावणाच्या आगमनी सणांची पंगत..२..
परसात फुलांचा ताटवा सुरंगी
चिंब गवताने सांगता गुपित
गुंजारव पाखरांचे मधुर नादात
साठवावा सुगंध अंतरीच्या कुपीत..३..
ओल्या मातीच्या ओल्या संवेदना
निसर्गाचे गीत सहदयी वाजता
श्रावणाच्या सरीत भिजावे एकदा
बेधुंद पावसाच्या आठवांचा बहर सजता
श्रावणाच्या सरीत भिजावे एकदा
बेधुंद पावसाच्या आठवांचा बहर सजता..४..
