आज कोसळ अशी सरे..
आज कोसळ अशी सरे..
आज कोसळ अशी सरे..
मनी आभाळ हे भरे..
डोळा आठवांचे झरे..
असे थेंब थेंब..
आज कोसळ अशी सरे..
उडो भावनांचे छर्रे..
किती मनावर चरे..
मोजू एक एक..
आज कोसळ अशी सरे..
भिजो अंतरंग सारे..
मग विचारांचे वारे..
कसे शांत शांत..
आज कोसळ अशी सरे..
मोडो साऱ्यांचीच घरे..
मग संधीचीया द्वारे..
कशी खुली खुली..
आज कोसळ अशी सरे..
युद्ध युद्धालाचं हरे..
मग जोडूनिया करे..
होती भेटी गाठी..
आज कोसळ अशी सरे..
नको कोणाचेच नारे..
आम्हा स्वतःचेच भारे..
झाले जड जड..
आज कोसळ अशी सरे..
काही वाटेनाच खरे..
पुन्हा न्हाऊनिया बरे..
व्हावे मुक्त मुक्त..
