निरोप #सरळ शब्दात
निरोप #सरळ शब्दात
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
निरोप देतो आता तुला, दुःख यातना आमच्या सोबत तू घेऊन जा.
आज रस्ता सुनसान सारा, जो तो इथे घरातच आहे.
ना तुझा थाट माट ना जल्लोष आज इथे आहे
ना मिरवणूकीची धांदल आहे, ना रांगोळी चे पायघडे.
ना ढोल ताशा ना वाजंत्री सनई चौघडे.
डॉक्टर,पोलीस सफाई कामगार यांच्यात तुझे रूप पाहिले.
यंदा तुझं येणं मनाला भावलंच नाही.
तुझं अस्तित्व मंगलमय भासलेच नाही.
काय पाहिलेस तू इथे येऊन, कोरोनाचे सावट.
नाहीत सुरक्षित मुली महिला, कायम बलात्काराचे संकट.
तू ये पुन्हा आणि दे यांना बुद्धी माणूसकिने वागण्याची.
तुझीच आस तुझीच ओढ वाट पाहतो पुन्हा आगमनाची.
