STORYMIRROR

Maharudra Popade

Drama Tragedy

3.9  

Maharudra Popade

Drama Tragedy

कोरोना विषाणू

कोरोना विषाणू

1 min
97


कोरोनाने जग सारे, झाले आहे ठप्प         

देव कसा बसला आहे, मूग गिळून गप्प !


मंदिर-मस्जिद-चर्च-गुरुद्वारे, सारे झाले बंद        

ईश्वरानेच केले मानवासी, त्याची दारे बंद !       


रेल्वे-विमान-जहाज-बस, सारे ताफा बंद       

पशु-पक्षी-प्राणी झाले, कोरोनाने स्वच्छंद !


कोरोनाने झाले नातेवाईक-बहीण-भाऊ त्रस्त।

कोणालाच ठेवले नाही, त्याने जगण्याचे शस्त्र !     


कोरोनाने ठेवले मानवाला, स्वतःतच व्यस्त      

जगण्यासाठी त्याला केले, घरातच बंदिस

्त !     


कोरोनाने पाहिले नाही, गोर-गरीब-श्रीमंत

लहान-थोर सर्वांनाच केले, त्याने वेष्टनात बंद !        


कोरोनात दिसला खरा, मानवातला देव       

डॉक्टराला देव मानून, केला त्याचा जय !             


कोरोनाने केले सर्व, नातलग दूर।      

स्मशानात गाडायाला, आले पालिकेचे दूत !          


मानवाने निसर्गाची, केली दारे बंद।      

म्हणूनच ईश्वराने केला, कोरोनाचा प्रबंध !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama