सरळ शब्द
सरळ शब्द


सरळ शब्दात नाते प्रेमाचे
सरळ शब्दात सामर्थ्य जगण्याचे !
सरळ शब्दात जगणे मानवाचे
सरळ शब्दात राहणे महत्त्वाचे !
सरळ शब्दात घुसतो तो शब्द
सरळ शब्दात धार शब्दाची !
सरळ शब्दाला कोणी न वाकडे
सरळ शब्दाचा मार हा भारी !
सरळ शब्दात ताकत शक्तीची
सरळ शब्दात उपासना भक्तीची !
सरळ शब्दात कर्मनेवाधिकारस्ते
सरळ शब्दात सामर्थ्य अर्जुनाचे !
सरळ शब्दात सारथ्य भगवंताचे
सरळ शब्दात साथ सत्याची !
सरळ शब्द जहर वचनाचे
सरळ शब्द कर्तव्य मानवाचे !
सरळ शब्दात आहे पारदर्शकता
सरळ शब्दात आहे प्रामाणिकपणा !
सरळ शब्दात नात्याचा निरोगीपणा
सरळ शब्दाचे महत्त्व अपार !
सरळ शब्दाला कोणी ना करे तडीपार !
सरळ शब्दात ताकत भक्तीची
सरळ शब्दात कास सत्याची !
सरळ शब्दात कृपा ईश्वराची
सरळ शब्दाला साथ सर्वांची !
सरळ शब्दात संघटना शक्तीची
सरळ शब्दाला भीतो दुर्जन !
सरळ शब्दात तप सावित्रीचे
सरळ शब्दाला साथ यमाची !
सरळ शब्दाची किमया अपरंपार
सरळ शब्दाचा कोणी न करे प्रतिकार !
महारुद्र म्हणे सरळ शब्द हा खूप सरळ
सरळ शब्दात आहे खूप मोठी पावर !