प्रेमदिवाना
प्रेमदिवाना
कोरीव तुझ्या डोळ्यात
कोरली वेरूळची लेणी!
मदमस्त चालण्यात,
जीव झाला जायबंदी!!
लाडिक तुझ्या बोलण्याने
झालो प्रेम दिवाना!
लैला-लैला करत,
ठरलो पुरता वेडा!!
प्रेम मी केले कसे,
मला कसे कळले नाही!
दगडावर प्रेम न करणे,
हे मला वळले नाही!!
एक क्षण वाटले मला,
तू मला साथ देशी!
मृगजळामागे धावत,
मी पडलो तोंडघशी!!
प्रेम हे करायचे नसते,
हे मला कधी कळलेच नाही!
प्रेम फक्त कवितेत वाचायचे असते,
ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही!!