धास्ती कोरोनाची
धास्ती कोरोनाची
घराबाहेर भीती कोरोनाची
घरात भीती बायकोची
रस्त्यावर भीती पोलिसाची
दवाखान्यात भीती डॉक्टरची
ऑफिसात भीती अधिकाऱ्याची
कॉलनीत भीती सायरनची।
माणसाला भीती मृत्यूची
मृत्यूला साथ पालिकेची
गाडायला हात बुलडोझरचे!
जगणे झाले महाग
मरणे झाले स्वस्त।
विचार करा स्वस्थ।
घरातच रहा व्यस्त!