चाफेकळी
चाफेकळी


सुंदर रूप हे गोजिरे
दिसते कसे ग साजिरे।
रुपलावण्य हे मनोहरी
नाक जसे चाफेकळी।
तू मदनाची मंजिरी
वेड लावू नकोस बावरी !
सुहास्य वदन हे सदा हसे
तू वेड लाविले मला कसे !
गोल गालावरती खळी तुझ्या
का वेड लाविले तू मला !
ओठावरती तीळ दिसे
दृष्ट लागू नये म्हणे।
रसमधूर हे बोल असे
प्रेमात मी पडू कसे?