कोरोना-19
कोरोना-19


कोरोना-19ने पाडलाय कीस
बायको करतेय घरातच फिस-फिस !
क्वारंटाईनमध्ये होतोय विजनवास
खाण्या-पिण्याचा होतोय कारावास !
आयसोलेशन वॉर्ड म्हणजे कारावास
विना डॉक्टर कंपौंडरचा होतोय त्रास !
लॉकडाऊन म्हणजे सर्व बाजार बंद
परंतु मानवाला केले त्याने स्वच्छंद !
जिल्हाबंदीने घातलाय चांगलाच धुडघुस
चौकीवर चाललीय पोलिसांची धुसफूस !
कोरोना-19 ने मेला तर येतात यमदूत
करतात सेवा जनतेची नगराचे दूत !
घरात माहिती घेण्यास येतात आशादूत।
आर्सेनिक अल्बम-30 देऊन करतात खुश !
कोरोना-19च्या काळात आलाय काढ्याला पूर
कोरोना-19 झाला दूर, लागलाय मूळव्याधीचा सूर
म्हणून म्हणतो कोरोना-19मध्ये लावा सूर।
खा-प्या मजा करा, अन् नाचा भरपूर !