आई
आई
तुला जाणताना अवघे आयुष्य गेले माझे कसे पेलेलेस निरपेक्षेने आई सारे ओझे
तुझे स्वरूप , चैतन्य रूप
सदा असायचा तुला हुरूप
साऱ्यासाठी उपसायचीस कष्ट खूप
तुझ्यातच सारे ब्रम्हांड होते माझे आई...
आज तुझी आठवण काढताना
डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात
सर्व जवळ असूनही मनातून पुन्हा तुला बोलवतात.
जिथे आहेस तिथून सारे बघत आहेस का आई
तुझ्याशिवाय जगण्यातली मजाच काही नाही.....
कधी कठोर तर कधी मायेने वाढवलेस तू मला.
काय चांगले काय वाईट शिकवलेस सारे
मला.
साऱ्यांना आपलेसे करण्याची कला तुझ्याच ठायी
किती आणि काय काय शिकवून आम्हाला शहाणे केलेस आई!....
तुझ्या मनातला प्रेमाचा झरा सतत झरायचा.
शिकवलेस तू सर्वांचा विचार पहिला करायचा.
तुझ्या विना अनाथ वाटे, जीव कासावीस होई.
पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घ्यावा वाटे आई...
