क्षण आजचा मोलाचा
क्षण आजचा मोलाचा
1 min
632
आहेच पुढे रहाट गाडगे कामधंदा, नोकरीचे.
बालपणीचा काळ सुखाचा भरपूर खेळायचे.
रम्य असे ते बालपण, कसलीच चिंता नाही.
झालो एकदा मोठे की जबाबदारी
येई.
लहानपण आनंदाचा असतो मोठा
ठेवा.
खाओ, पीओ, मजा करो खरी मजा
तेव्हा.
नजरेसमोर ध्येय असावे, प्रयत्न
करावे पुरेपूर.
उद्दिष्टांची कमान पार करावी, यश
मग नसे दूर.
पुढे येईल कसा काळ आज कुणाला
ना कळे.
वेळ न थांबे कधी कुणासाठी, सदा पुढे पुढे पळे.
करावा आजचा दिवस साजरा , मनी
समाधान हवे.
करु प्रयत्न मनापासून,स्वागताला सज्ज उद्या जग नवे.
