काळी आई
काळी आई
1 min
971
हो , मीच तो शेतकरी
उन्हातान्हातून काम करतो
शेताच्या जीवावर माझ्या
लेकरा बाळाचं पोट भरतो
मातीने माखतात हात माझे
जेव्हा तिला मी गोंजारतो प्रेमाने
तिची मशागत , तिची नांगरणी
सारे काही करतो नेमाने.
ती ही जपते खूप मला
देते भरभरून सुख
बसतो कितीदा निवांत सोबत
न्याहाळतो तिचे रूप
मातीतून आलो आपण
मिसळणार सुद्धा मातीत.
तिच्या स्पर्शाने माया मिळते
सुखावतो तिच्या साथीत
पर्जन्य राजाच्या कृपेने
शेतात पिकवतो मी मोती
कष्टकरी जात आमची
आईच आमची ही माती
