STORYMIRROR

ujvala korde

Others

4  

ujvala korde

Others

जीवनपटावर जगताना

जीवनपटावर जगताना

1 min
186

आयुष्याच्या पटावरली

आपण प्यादी सारी

कोण वजीर , कोण राजा

ज्याचे नशीब भारी


स्थान असो कोणतेही

टिकवायला स्वकष्टच हवे

कोण कुठून कसा करी वार

कुणी उगीच आपला भासवे


कुणी चाले तिरके, कुणी सरळ

तर कुणी अडीच घरे चाले

एकाग्रता नसेल जर अंगी

आपले बुड सहज हाले.


भविष्याचा वेध घेत जर

आपली असेल जर खेळी

तरच जगात टिकाव धरू

कितीही संकटाच्या वेळी


बुद्धी च्या बळावरच करू

जीवनावर मात

असो प्यादे अथवा राजा

जगू आपण आरामात


Rate this content
Log in