STORYMIRROR

ujvala korde

Tragedy

3  

ujvala korde

Tragedy

वादळ

वादळ

1 min
593

घर संसार जीवन सारे

अचनक उध्वस्त झाले

माझ्या आयुष्यात अचानक

एक मोठे वादळ आले.


मित्रांच्या संगतीने नको

तिथे वाहत गेलो

चुकीच्या मार्गावर

वासनेचा बळी झालो


कर्जात बुडून गेलो

व्यसनात अधीन झालो

बायको मुलाच्या नजरेतून

पुरा उतरून गेलो.


आयुष्याची गाडीच

रुळावरून खाली घसरली.

माझ्या दुष्कर्मांची बातमी

सगळीकडे अशीच पसरली.


दुभंगले घर , बायको

मुलं सोडून गेले.

एकटेच चार भिंती आड

जिणे नशिबी आले.


स्वतः च्याच हाताने केली

मीच आयुष्यची माती.

तुटले सारे पाश आणि

सारी रक्ताची नाती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy