STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

3  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

अजिंक्य

अजिंक्य

1 min
472


अजिंक्य


रोज जातो तो कामाला

विझवाया आग पोटाची,

नाही चांदण्यांची स्वप्न

साधीसुधी राहणी त्याची ॥१॥


ना कधी मागितला चंद्र

भाकरीच्या चंद्रातच सुख,

पगारासाठी होता उशिर

लागते त्याला रूखरूख ॥२॥


'जिंकणे' हेच शब्दकोशात

नेहमीच तो जिंकत आला,

खिलाडूपणा बाणवून अंगी

लढावयास सज्ज झाला ॥३॥


मांडताना डाव जीवनाचा

मोडक्या संसारात रमला,

नऊ ते सहा वेळ पाळत

रात्री शांत झोपेत नीजला ॥४॥


जरी काही चिरडली स्वप्ने

चालताना हा मार्ग सरळ,

सदैव राहिला ताठ कणा

समाधानाने भरली ओंजळ ॥५॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational