Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

3  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

संघमित्रा

संघमित्रा

1 min
299



सांघिक खेळांचे । योगदान खूप ।

अविभक्त रूप । प्रकटते ।।


खेळांचा विकास । गरज काळाची ।

बाजी जिंकण्याची । नवी संधी ।।


नेतृत्व भावना । अंगी बाणवावी ।

यशामध्ये व्हावी । परिणती ।।


कबड्डी वा खोखो । क्रिकेट, साॅकर ।

गाठावे शिखर । प्रयत्नांती ।।


आत्मविश्वासाने । प्राप्त होते स्फूर्ती ।

पसरते कीर्ती । जगभर ।।


न्यायपूर्ण खेळी । नियमांना पाळा ।

दुराचार टाळा । क्रिडांगणी ।।


नाही जात-पात । नाही धर्म ।

एकमेव कर्म । खेळण्याचे ।।


राष्ट्रीय ऐक्यात । आहे खरी शोभा ।

देशाचा तो गाभा । अमोलिक ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational