STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

4  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

म्हातारपणाची काठी

म्हातारपणाची काठी

1 min
504

जिने घडवले

होती ती आई

करावी उतराई

मायेची...


कर्त्या पुरुषाचा

वडिलांना मिळतो मान,

जीवनातील स्थान

देवासमान...


लेकरांना घडवाया

जीवाचे केले रान,

मिळाला अपमान

दुर्भाग्यदायी...


नव्या पिढीची

स्वप्न झाली मोठी,

म्हातारपणाची काठी

हरवली...


कष्टांचा विसर

कसा काय पडला?

अहंकार भिनला

नसानसात...


अडचणींच्या नावे

आणून सोडले आश्रमा,

घराला काळिमा

फासला...


बदलली संस्कृती

स्वार्थ जगी बोकाळला,

विश्वासघात केला

लेकरांनी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational