लाडीगोडीचा प्रपंच
लाडीगोडीचा प्रपंच
देवा-ब्राह्मणांची साक्ष
अग्निभोवती फेरे सात,
घालून पुष्पहार प्रेमाचा
सोहळा रंगला थाटात ॥१॥
ठेचाळता तू कधी वाटा
दावेन मी तुजला मार्ग,
जरी असो काट्यांचाही
त्याचा करू आपण स्वर्ग ॥२॥
नाही कसलाही तो मोह
प्रोत्साहन असावे पाठी,
अहंकाराची आग नको
प्रेम पुरेसे आपल्यासाठी ॥३॥
सर्वांगाने तुला मी वरले
विश्वासाची जन्मगाठ,
लाडीगोडीचा प्रपंच
मी नदी, तू माझा काठ ॥४॥