STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

4  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन

1 min
1.2K

हिरवळ संपली

र्‍हास झाला पर्यावरणाचा

अपमान धरणीचा

लाजिरवाणा...


अमोनिया मिश्रित

प्रदूषित झाला वायू

झाली अल्पायू

वृक्षवल्ली...


मानवजात करते

वृक्षांवर केवढा आघात

समग्र वृक्षजात

नष्ट...


वनश्रीला तडा

ठिणगी ही पेटली

प्राणज्योत मावळली

निसर्गाची...


तीव्र घाव 

सोसती झाडे वेली

दुरावस्था केली

मानवाने...


कसा आवरावा

धरणीचा असह्य त्रास

एकच ध्यास

वृक्षारोपणाचा...


रानशेते हरवली

फांदी कोरी रिकामी

व्हा पुरोगामी

कृषीसंवर्धनात...


धरू ध्यास

थांववू ही वृक्षतोड

छोटीशी तडजोड

सावरेल...


धरणीचे सौंदर्य

दडले तिच्या हिरवाईत

नको पंचाईत

तिची...


शमवू वेदना

संकटात हा निसर्ग

बनवूया स्वर्ग

पहिल्यासारखा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational